सेतु सुविधा केंद्र बनले दलालांचा अड्डा ! महसूल विभाग धृतराष्ट्र यांच्या भूमिकेत,
नागरिकांना एकतर वेळेवर दाखले मिळत नाही. आणि ते वेळेवर मिळवण्यासाठी वरून दहापट पैसे देऊन सुध्दा अरेरावी ऐकून घ्यावी लागत आहे. त्यामुळे सामन्याच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. तसेच या केंद्रात कुठल्या कागद पत्रासाठी किती शासकिय फी? किती दिवसात मिळेल? फी घेतली तर त्याची पावती मागणी केली? तर ती सुद्धा दिली जात नाही. सेतु केंद्र आतून सर्वच कागद पत्रासाठी भरमसाठ पैसे घेवून सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात आहे. सामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावीत या उद्देशांनी शासनाने खेडोपाडी महा,ई- सेवा केंद्र सुरू केली परंतु एजंटची मनमानी , शासनाचे लक्ष नसल्याने दलालांचा सुळसुळाट होऊन नागरिकांना इतर कोणतीही सुविधा मिळत नाही. काही वेळेला संगणक तांत्रिक अडचणी सांगून ताटकळत ठेवण्यात येते. तर दुसरीकडे दलालमार्फत आलेल्या ग्राहकांना कोणतेही दाखले विना विलंब मिळत आहे. तरी नागरिकांना वेळ व पैसा वाचुन वेळेत सुविधा पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सामन्याची आर्थिक लूट थांबून केंद्र चालकांवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली आहे.
सोनई येथील सेतु केंद्र चालकाकडून तहसील कार्यालयाशी सबंधित कागदपत्रासाठी जनतेची लूट होत आहे. तसेच कायमस्वरूपी शासन दरपत्रक लावून कारवाई करण्याची मागणी माननीय तहसीलदार यांच्या कडे केली आहे. -अनिल बारहाते ग्रा. प. स. सोनई