सातारा सिव्हिलला तीन कोटींचं सीटी स्कॅन मशीन येणार असल्याची घोषणा पहिल्या मशिनप्रमाणे दुसरेही उपजिल्हा रुग्णालयासाठी पळविले जाणार का?
सातारा : गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांची होणारी ससेहोलपट आणि आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. तीन कोटीं रुपये खर्चून सीटी स्कॅन मशीन लवकरच रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार असल्याची चर्चा माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या कार्यकालात सुरु होते. त्यांची नाशिकला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले डॉ. श्रीकांत भाई यांनीही त्याच घोषणा करण्यास सुरू केली आहे. मशीन येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे डॉ. भोई सांगत आहेत. मात्र, त्याचा मुर्हुत कधी हे मात्र, ते सांगत नाहीत कारण आपला सेवानिवृत्तीचा कार्यकाल जवळ आल्याने तोपर्यंत काय उत्तर द्यायचे, असाही त्यांच्यासमोर प्रश्न उभा आहे. दरम्यान, पहिले सीटी स्कॅन मशिन कराड उत्तरचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात धूळ खाण्यासाठी नेण्यात आले. आता त्याच काळात पालकमंत्री असणारे रामराजे नाईक-निंबाळकर विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यामुळे राजकीय चढाओढीपाई हे मशिन फलटणला जाणार नाही, यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडे मशिन सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच चर्चा सुरु झाल्या आहेत.
सातारा शहर हे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाशेजारी आहे. येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या हेतूने गेल्या सहा वर्षापूर्वी सीटी स्कॅन मशिन बसविण्यात आले होते. मात्र, तत्कालीन राजकीय लोकांच्या मनोवृत्तीमुळे हे सीटी स्कॅन मशिन कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या स्थालांतरणास कराड शहरातून महामार्ग जात असल्याने सातारच्या जिल्हा रुग्णालयापेक्षा कराडच्या उपजिल्हारुग्णालयास याची जास्त गरज असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मशिन पुरविलेल्या कंपनीने दुसर्या ठिकाणी मशिन सुरु केल्यास मशिनमध्ये बिघाड येवू शकतात, तसेच त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी घेण्याचे टाळल्याने हे मशिन गेल्या पाच वर्षात एकाही रुग्णाला सेवा देवू शकले नाही. राजकीय इच्छाशक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील गरजू रुग्णांना खाजगी डॉक्टरांच्या सेवेवर अवलंबून रहावे लागत आहे. या स्थालांतरणाच्या प्रक्रियेत सध्याचे कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयात येणार्या रुग्णांचा विचार न करता मशिन कराडला हलविण्यास आरोग्य विभागाला भाग पाडले. त्या काळात सध्याचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनीही याकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. कारण पालकमंत्र्यांनी जर विरोध केला असता तर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी दुसरे मशिन घेण्याबाबत निर्णय झाला असता.
सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई हे सांगली जिल्ह्यातील मुळचे रहिवाशी आहे. त्यांचा मिळालेली बढती व त्यापाठोपाठ सेवानिवृत्ती यामुळे थंडा-थंडा-कुल-कुल या पध्दतीने कागदावरील कामे तात्काळ निपटविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कार्यकालात जिल्हा रुग्णालयाच्या कामाकाजात तसा काही नवा फरक जाणवला नाही. मात्र, रुग्णालयातील इतर अधिकार्यांचे जे सुरु होते त्यात त्यांनी कोणताही हस्तक्षेप करून कोणालाही अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामध्ये बाह्य रुग्ण विभागात काम करणारे वैद्यकीय अधिकारी किती वेळ खुर्चीत असतात, ते किती रुग्णांची तपासणी करतात, की, जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या शिकाऊ डॉक्टरांच्यावर जबाबदारी टाकून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील टपरीसमोर चहापान करतात. या अशा अनेक बाबी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यकक्षेत येतात. मात्र, डॉ. भोई यांच्या कार्यकालात कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचारी कशी सेवा देत आहे, याचे मुल्यमापन करण्याचा प्रयत्न जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने केला नाही. सर्व काही गुड-गुड सुरु आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते औषध खरेदीपर्यंतची कामे आता सरकारी पध्दतीने होत असल्याचे पहावयास मिळेल. गेल्या काही दिवसापासून खोकल्याच्या औषधांचा तुटवडा आहे. मात्र, याबाबत मागणी करूनही 15 दिवस औषध जिल्हा रुग्णालयास उपलब्ध होत नाही ही खेदाची बाब आहे.
जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन येणार असल्याचे डॉ. भोई यांनी पत्रकार परिषदेदरम्यान जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यासमोर कबुल केले. मात्र, कोणत्या महिन्यात हे मशिन जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सेवा देईल, हे मात्र ते ठामपणे सांगू शकले नाहीत. कारण हे मशिन जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचेल याची त्यांना खात्री नाही. कारण मागील मशिन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्या काळात कराडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी नेण्यात आले. आता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आहेत, तेही येणारे मशिन फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयास नेण्याची तयारी करू शकतात. हे करताना सातारा येथील औद्योगिक वसाहत मोडकळीस आली आहे. तसेच फलटण येथील औद्योगिक वसाहत जोमाने सुरु असल्याने येथील लोकांना सीटी स्कॅन मशिनची जास्त गरज असल्याचे म्हणू शकतात. तसेच ते त्यांच्या सर्वाधिकारांचा वापर करून ते मशिन फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात नेवू शकतात, हे त्रिकालबाधीत सत्य आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी चार वर्षापूर्वी खरेदी केलेले मशिन जिल्हा रुग्णालयातून इतरत्र जाणार नाही, यासाठी कोणत्याही उपाय योजना केल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यपध्दतीतून दिसून येत आहे.