Breaking News

दिल्लीसह उत्तर भारतात भुकंपाचे धक्के.


नवी दिल्ली : उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला असून, रिश्टरस्केलवर त्याची तीव्रता 6. 1 इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगामध्ये असल्याचे आढळून आले. बुधवारी दुपारी पावणे बाराच्या सुमाराला उत्तर भारताच्या दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि काश्मीर राज्यांमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. जाणवल्यानंतर एकच खळबळ उडाली. गेल्या महिन्यातही उत्तर भारतात सौम्य स्वरुपाचा भूकंप झाला होता.