Breaking News

शहर इलाखा साबां शाखा अभियंत्यांचा खुलासा बेमूर्वतखोरपणाचा कळस उच्च न्यायालयातील सेवा केंद्राच्या भंगार चोरी प्रकरणाला वेगळे वळण

मुंबई/ विशेष प्रतिनिधी :मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गात शहर इलाखा विभागाचे शाखा अभियंता विजय बापट यांच्या ऐंशी लाखाच्या भंगार चोरी प्रकरणाशी संबंधीत खुलाशावरून सार्वजनिक बांधकाम विभागातून तिव्र प्रतिक्रिया उमटत असून अनैतिक वर्तन करणार्या व्यक्तीने सज्जनतेचा आव आणण्याचा बेमुवर्तखोरपणा करण्यासारखे आहे असा सुर उमटत आहे.दरम्यान शाखा अभियंत्यांचा हा खुलासा साबां प्रशासन पातवीवर किती परिणाम साधेल याकडे धुरीणांचे लक्ष्य लागले आहे.

दि,11 व 12 फेब्रूवारी 2017 शासकीय सुटीचे दिवस, सलग दोन दिवस सुटी असल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट. दैन्यदिन शासकीय आवक जावकही स्तब्ध. परिणामी आवकजावकशी संबंधीत यंञणाही आपल्याच मस्तीत व्यस्त. नेमक्या याच काळात शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उच्च न्यायालय सेवा केंद्राच्या भंगार मालावर डल्ला मारण्यात आला.या भंगार मालाची किंमत थोडी थिडकी नव्हे तर तब्बल ऐंशी लाख रूपये असल्याचा दावा साबांतून केला जात आहे. या भंगार गायब झाल्याचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर साबां प्रशासनाला हादरे बसण्यास सुरूवात झाली. 

माञ परस्पर संबंध आणि त्यातून निर्माण झालेले साटेलोटे यामुळे हे प्रकरण परस्पर निकाली लावण्याचा प्रयत्न सुरूवातीला झाला. तथापी आ.चरणाभाऊ वाघमारे यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून शाखा अभियंता विजय बापट यांचा संबंध दिसत असल्याने त्या दिशेने चौकशी करून संबंधीत शाखा अभियंता यांना निलंबीत करण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधींच्या तक्रार अर्जामुळे साबां प्रशासनाला या प्रकरणाची चौकशी करणे भाग पडले. आणि या भंगार चोरी प्रकरणासंदर्भात चौकशीचे चक्र फिरले. सर्वप्रथम शाखा अभियंता विजय बापट यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.या कारणे दाखवा नोटीसमध्ये गेट पास, एक ट्रक मालासंदर्भात विवेचन आणि अन्य तत्सम संशयास्पद विषयावर खुलासा मागवला. या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देतांना केलेला खुलासा बेमूवर्तखोरपणाचा कळस ठरत असल्याची चर्चा साबांत सुरू आहे,दरम्यान हा खुलासा साबां प्रशासनाने फेटाळल्याचे वृत्त आहे, या पार्श्‍वभुमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधीत शाखा अभियंत्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वाढली असल्याची चर्चा आहे.