Breaking News

गिफ्ट पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकले आहे सांगून महिलेची फसवणूक

पुणे,  - बँकेकडून आलेले गिफ्ट पार्सल कस्टम ऑफीसमध्ये अडकले असून ते सोडवण्यासाठी म्हणून महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 6 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान झाली. कौसल्या ग्वालानी (वय 39 रा. थेरगाव) यां पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसल्या यांना पाच वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन वेळोवेळी फोन आले ज्यामध्ये त्यांना एसबीआय व अ‍ॅक्सिस बँक खातेधारकांनी कौसल्या यांना गिफ्ट पार्सल लागले असून ते दिल्ली येथील कस्टम ऑफीसमध्ये अडकल्याचे सांगितले. हे पार्सल सोडवण्यासाठी त्यांच्याकडून असे एक लाख 50 हजार 500 रुपये बँक खात्यावर टाकायला लावून त्यांची दीड लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस याचा तपास करत असून कोणतीही बँक असे गिफ्ट पार्सल पाठवत नाही व कस्टम ऑफीसमध्ये पार्सल अडकले तर तुम्हाला कस्टम ऑफिसकडूनच विचारणा होते. त्यामुळे नागरिकांनी खात्री पटल्याशिवाय अशा पक्रारे व्यवहार करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.