Breaking News

परिवहन खात्यातून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना 20 हजार रुपयेे मिळणार


सोलापूर,  सोलापूर परिवहन खात्यातून निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांना दहा हजार ऐवजी 20 हजार रुपयेे देणेे, त्यांच्या सत्कारासाठी प्रत्येकी 3200 रुपये खर्च, कारमधून घरापर्यंत सोडणे आदी निर्णय समितीच्या सभेत घेण्यात आले. महापालिका परिवहन समितीची सभा झाली. अंध, दिव्यांग , मूकबधीर, कर्णबधीर यांना 20 कि मीपर्यंत मोफत प्रवास देणे याबाबत प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. बस थांब्यास जांबमुनी बस थांबा असे नाव देणे, असे निर्णय झाल्याची माहिती सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी दिली. परिवहन सेवकांना वेतन देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सदस्य परशुराम भिसे यांनी केली.