Breaking News

हॉटेलमध्ये वीज चोरुन वापरल्याप्रकरणी मालक अटकेत


ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या मँगो गार्डन हॉटेलचे मालक जयराम गुदाडे यांना वीज चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांनी जवळपास 10 लाख रूपयांची वीज चोरून वापरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी राज्य विद्युत वितरण कंपनीने गुदाडे याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयराम हा त्याच्या हॉटेलमध्ये अनेक दिवसांपासून वीज चोरी करुन वापरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर टोरँट पॉवर कंपनी व राज्य विद्युत वितरणच्या दक्षता पथकाने संयुक्त कारवाई करुन त्याला अटक केली. जयराम याला न्यायलयासमोर हजर केले असता 29 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.