शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंड या जागतिक दर्जाच्या संस्थेने सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले स्थान आणि सर्वाधिक धार्मिक सेवा देणार्या स्थानांच्या सन्माननीय अशा वर्गवारीत जागतिक स्तरावर नोंद केली असून याबाबतचे प्रमाणपत्र या संस्थेचे समन्वयक विक्रम त्रिवेदी यांनी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे सुपुर्त केले. याप्रसंगी संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उप कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेर, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.मुरंबीकर, उप वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे व वैद्यकीय अधिक्षिका मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते.या सन्मानाबद्दल अग्रवाल यांच्या हस्ते त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.
शिर्डीची जागतिक स्तरावर नोंद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:50
Rating: 5