Breaking News

राज्यस्तरीय बहुजन भूषण पुरस्कार संजय सुखधान यांना


नेवासा शहर प्रतिनिधी :- तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संत रोहिदास महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बहूजन भूषण पुरस्कार यावर्षी लोकशाही विचारमंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सीभाऊ एडके यांनी दिली. सामाजिक कामामध्ये तसेच बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवर कामांव्दारे योगदान दिल्याबद्दल सुखधान यांना हा पुरस्कार जाहीर झाला. बुधवारी { दि. ३१} बालाजी देडगाव येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रदान करण्यात येणार आहे. बहुजन समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सुखधान यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.