श्रीनगर : भारतीय लष्करांच्या जवानांनी घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पाच दहशतवाद्यांना कं ठस्नान घातले. स्थानिक पोलीस आणि लष्कराने ही संयुक्त कारवाई केली. दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने जैश ए मोहम्मदचे चार दहशतवादी काश्मीरमध्ये घुसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही धाडसी कारवाई करण्यात आली. आधी तीन अतिरेक्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले होते. मात्र चौथा अतिरेकी लपून बसला होता. जम्मू काश्मीर पोलीस, सैन्य आणि सीआरपीएफने संयुक्त कारवाई करत, त्यालाही शोधून काढले. त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत जवानांनी त्यालाही यमसदनी धाडले. दरम्यान, या कारवाईबद्दल जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक शेष पॉल यांनी सुरक्षारक्षकांचे कौतुक केले. सुरक्षारक्षकांना रविवारी काही स्फोटके आढळली होती. याशिवाय शनिवारी श्रीनगर-मुजफ्फराबाद शक्त ीशाली स्फोटके निकामी करण्यात सुरक्षारक्षकांना यश आले होते. ही सर्व प्रकरणे पाहता, अतिरेक्यांचा भारतात हल्ला करण्याचा मोठा डाव आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात बीएसएफच्या जवानांनी घुसखोरीच्या तयारीत असलेले जवळजवळ 10 घुसखोरांना ठार केले होते. सोमवारी सकाळी लष्कराकडून पुन्हा ही मोठी कारवाई करत यश मिळवलेले आहे. सध्या ही कारवाई जरी थांबली असली तरी जम्मू-कश्मीर परिसरात आणखी घुसखोरी करणारे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बीएसएफचे जवान अगदी अलर्ट होऊन काम करत आहे. काही दिवसांवर 26 जानेवारी आली आहे आणि याच मुद्द्यावर हे दहशतवादी आले का ? अशी शंकाही विचारण्यात येतेय. पण सुरक्षेच्या दृष्टीने सगळीकडे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांचा खात्मा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:51
Rating: 5