Breaking News

प्रज्ञा वाळके अपहाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याचे प्रतिमा हनन

मुंबई/विशेष प्रतिनिधी :- सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाबाची गुहा आणि प्रज्ञा वाळके यांच्यासारखे कार्यकारी अभियंता म्हणजे चाळीस चोरांच्या टोळीचे सरदार आहेत अशा शब्दात सार्वजनिक बांधकाम खात्यात काम करणारे मजूर संस्था आणि खासगी कंत्राटदार आपल्या संतप्त भावना व्यक्त करू लागले आहेत. प्रज्ञा वाळके यांच्यासारखे कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणारे मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी, साबांतील वरिष्ठ अभियंते आणि काही लोक प्रतिनिधी यांच्या संवेदनहीन प्रवृत्तीमुळे मुख्यमंत्री आणि साबां मंत्र्यांच्या प्रतिमेचे हनन तर होतेच शिवाय या भ्रष्ट प्रवृत्तींच्या टक्केवारी धोरणामुळे देयके वर्षानुवर्षे प्रलंबित असल्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंत्राटदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याच्या संतप्त प्रतिक्रीया साबां वर्तूळात उमटू लागल्या आहेत.


शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात झालेले मनोरा आमदार निवास इमारतीचे अपहार प्रकरण अनेक घटकांच्या मुळावर उठले आहे. या प्रकरणाने मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लोकप्रतिनिधींची विश्‍वासार्हता महाराष्ट्राच्या वेशीवर टांगली गेली तर दुसर्‍या बाजूला या भ्रष्ट प्रवृत्तींमुळे कंत्राटदारांना त्यांची देयके मिळत नसल्याने कामासाठी कर्जाऊ घेतलेला निधी परत करणे शक्य होत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळात झालेला अपहार या घडामोडींचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. आमदारांच्याच कक्षात कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून, आ. चरणभाऊ वाघमारेंसारख्या दक्ष लोकप्रतिनिधींनी तक्रार करूनही प्रज्ञा वाळके यांच्यावर कारवाई होत नसल्याने देयकांच्या प्रतिक्षेत असलेले कंत्राटदार हतबल झाले आहेत. प्रज्ञा वाळकेंच्या या उदाहरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्याधिकारावर भ्रष्ट प्रवृत्तींनी मात केल्याचे बोलले जात असून सरकार म्हणून असलेला अंकूश संपुष्टात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दुसर्‍या बाजूला या अपहाराला काही लोकप्रतिनिधीही पाठीशी घालत असल्याने त्यांची जनतेचे विश्‍वस्त म्हणून अपेक्षित असलेली पाञताही अखेरच्या घटका मोजत आहे.
प्रज्ञा वाळकेंसारख्या भ्रष्ट प्रवृत्ती सोकावण्यास साबां मंत्रालयातील अधिकारी, साबांतील उच्चपदस्थ अभियंते आणि काही लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याची भावना वाढीस लागली असून चंद्रकांत दादा पाटील यांची दिशाभूल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिमा हनन करणार्‍या या चांडाळ चौकडीच्या मुसक्या आवळण्याची गरज प्र तिपादन केली जात आहे.

साबांच्या चाडांळ चौकडीला मुसक्या
प्रज्ञा वाळके अपहार प्रकरणात मुख्य नायकासोबत दुहेरी भुमिका वठविणार्या चांडाळ चौकडीची ओळख पटली असून त्यांच्या कारनाम्यांची कुंडली मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांना देण्याची तयारी सुरू आहे .या चांडाळ चौकडीचे सदस्य कोण? म्होरक्या कोण याचा सविस्तर तपशील उद्याच्या अंकात.