Breaking News

गोंदिया भंडारा जि. प.वर कांग्रेस पक्षाचा अध्यक्ष बसणार - नाना पटोले

गोंदिया  - पुढील अडीच वर्षाकरिता भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्षची निवडणूक उद्या 15 जानेवारीला होत असून नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या निवडणुकीची चुरस हि आणखीनच वाढणार आहे. आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले हे चांगलेच चर्चेत आले होते तर त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश केल्या नंतर काँगेसला या दोन्ही जिल्ह्यात बळकट करण्याचे संकल्प नाना यांनी केला असून उद्या भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष करिता होणारी निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची चिन्ह आहे तर या जिल्हा परिषदेवर काँगेस पक्षाचा अध्यक्ष बनेल असा विश्‍वास माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे .


सध्याचा स्थितीत या भंडारा जिल्हा परिषदचे पक्षीय बलाबल बघितले असता या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे तर अध्यक्ष पद काँगेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. एकूण 52 जागा पैकी 19 काँग्रेस , राष्ट्रवादी काँगेस 15 , भाजप 13 , अपक्ष 4 , व सेनेकडे 1 जागा आहे , तर तिकडे गोंदिया जिल्हा परिषद चा विचार केला या ठिकाणी भाजप तासेच काँग्रेस ची अभ्रद युती या पूर्वी झाली होतीय त्यामध्ये काँग्रेसकडे अध्यक्षपद तर भाजप कडे उपाध्यक्षपद होते ,एकूण 53 जागेपैकी भाजप 17 , राष्ट्रवादी काँगेस पक्ष 20 तर काँगेस कडे 16 जागा होत्या तर मागील निवडणुकीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस बाजी मारेल असे चिन्ह होते. मात्र काँगेस तसेच राष्ट्रवादी काँगेसची स्थानिक गटबाजी पाहता या ठिकाणी काँगेस ने भाजप सोबत ऐनवेळी हातमिळवणी करीत राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडली होती मात्र या वेळी , काँगेस पक्षाला नवीन चेहरा नाना पटोले हे मिळाले असल्यामुळे एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे हे निवडणूक त्यांचा राजीनामा दिल्यानंतर महत्वाची ठरणार आहे त्यामुळे उद्या दुपार पर्यंत या दोन्ही जिल्हा परिषदेवर कोण आजी मारणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.