खोट्या बंदुकीने धमकावणार्या भाजी विक्रेत्यास अटक
ठाणे - रस्त्यावरील भाजी विक्रेत्याने खोटी बंदूक दाखवून नागरिकांनी धमकावल्याची घटना येथे घडली आहे. वाटेत चालतांना मध्येच भाजीची गाडी येत असल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला घेण्याचा सल्ला नागरिकांनी भाजी विक्रेत्याला दिला होता. त्याचाच राग मनात ठेऊन त्याने हे कृत्य केले. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गंगाराम पांडुरंग आहेर (48) या भाजी विक्रेत्याला अटक केली आहे.
ठाण्याच्या उपवन परिसरात सध्या फेस्टिव्हल सुरू असून अटक झालेला भाजी विक्रेता गंगाराम हा उपवन परिसरात भाजीचा स्टॉल्स लावतो. उपवन फेस्टिव्हलला झालेल्या गर्दीमुळे रस्त्यात चालतांना भाजीची गाडी मध्ये येत होती. त्यामुळे दोन नागरिकांनी आहेर यांना जरा बाजूला भाजीचा धंदा लावण्याचे सांगितले. त्यावर रागावलेल्या आहेर यांनी जवळचे खेळण्यातील बंदूक काढून सांगणार्यांना धमकावले, अशी माहिती अधिकार्यांनी दिली. धमकावलेल्या नागरिकांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिल्यानंतर पो लिसांनी आहेर यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.