Breaking News

डान्टस लॉ कॉलेज कुडाळमध्ये युवा सांसद कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज, कुडाळ मध्ये नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग यांच्या वतीने पडोस युवा सांसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आयुष अधिकारी कृपा तारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.


या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा आयुष अधिकारी कृपा गावडे-तारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, महिला आणि बालविकास कक्ष सिंधुदुर्गच्या सामाजिक कार्यकर्त्या मधुरा पाटकर, जिल्हा उद्योग केंद्र व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शक राजेश वराडकर आणि निसर्गोपचार आणि योगतज्ज्ञ डॉ.साधना गुरव उपस्थित होते. तारी मॅडम यांनी आयुष प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र यावर, सामंत मॅडम यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, प्राधिकरणाचे कामकाज सिंधू विकासदूत यांवर, पाटकर मॅडमनी झजउडज -उढ, 2012 तसेच मुलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या ’प्रतिसाद’ अ‍ॅपबद्दल आणि स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल, वराडकर सरांनी व्यक्तिमत्व विक ासामध्ये श्रवण-संभाषण कौशल्य, देहबोली आणि चारित्र्य यांचे महत्व यासंबंधी तर डॉ. गुरव मॅडमनी सूक्ष्म व्यायाम, ध्यानमुद्रा आणि प्रत्यक्ष योगासनाच्या मदतीने निसर्गोपचार, योग आणि आरोग्य यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.