शाळेच्या इमारतीसाठी खा. रेखाकडून तीन कोटींचा निधी
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांच्या खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचे आर्थिक साह्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे.