जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणे भोवले अखेर पं.स.सभापती राजेश ठोके यांचे सदस्यत्व रद्द
सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): पंचायत समितीचे विद्यमान सभापती राजेश ठोके यांनी विहीत मुदत असलेल्या 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे चांगलेच भोवले आहे. त्यांनी सवडत पंचायत समिती सर्कल मधून राखीव असलेल्या अनुसूचित जाती संवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने या संदर्भात अपील दाखल केले होते. त्यावर जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी शासन निर्णयाद्वारे त्याची पंचायत समिती सदस्यत्वाची निवड रद्द केल्याचा आदेश दि.29 जानेवारी रोजी पारित केला आहे.
फेब्रुवारी 2017 ला पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या होत्या. त्यामध्ये सवडत अनुसूचित जाती राखीव गणातून राजेश ठोके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर पंचायत समिती सभापती पद राखीव (अ.जा.) असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीतून ते सभापती झाले होते. निवडणूक झाल्यावर 6 महिन्याच्या आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र एक वर्षाचा कालावधी होत असतानाही सभापती राजू ठोके यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. या संदर्भात तहसिलदार यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल पाठविला होता. या संदर्भात ठोके यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे यांनी केली होती. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात शासन निर्णय ग्रापपसनि 2014/प.क्र.159/पं.रा 2 दि.4 ऑगस्ट 2016 नुसार राजेश ठोके यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
आयुक्ताकडे दाद मागून स्थगिती आणणार : राजेश ठोके
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केला मात्र त्यांनी या संदर्भात त्रुटी असल्याची माहिती कळविली नाही. त्यामुळे वैधता प्रमाणपत्र सादर करता आले नाही. माझे वैधता प्रमाणपत्र जात वैधता समितीकडे पात्र झालेले आहे. त्यामुळे माझी चूक नसून त्याला प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे सदर निर्णयाविरुद्ध अमरावती आयुक्ताकडे दाद मागणार असून त्यावर स्थगिती मिळेल. आणि माझे सदस्यत्व कायम राहील. असा विश्वास सभापती ठोके यांनी व्यक्त केला आहे.