Breaking News

सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप - खा. अशोक चव्हाण

मुंबई,  कमला मिल दुर्घटनेला सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे.


आयटी पार्कला सवलती देण्याचे शासनाचे धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे. एफएसआयचा गैरवापर होत होता तर, मुंबई महापालिका व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात कारवाई का केली नाही ? असा प्रश्‍न खा. चव्हाण यांनी केला.

महापालिका आणि सरकारमधील लोकांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून याला राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजप नेते विरोधीपक्षांवर बिनबुडाचे आरोप करित आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.