Breaking News

भवानीपेठेत व्यापार्‍याच्या घरातून 11 तोळे दागिने, दीड लाख रोकड लंपास


सोलापूर, - व्यापार्‍याच्या बंद घरातून 11 तोळे सोन्याचे दागिने दीड लाख रुपये चोरांनी पळवले. ही घटना सकाळी दहाला उघडकीस आली. सुरेशकुमार तापडिया (रा. मंत्रीचंडकनगर, भवानीपेठ) यांनी जोडभावी पोलिसात तक्रार दिली आहे.

27 डिसेंबर रोजी पत्नीच्या माहेरील नातेवाईक वारल्यामुळे सगळेजण अमरावतीला गेले होते. आज सकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. मुख्य लोखंडी गेट लाकडी दरवाजा उघडून कपाटातील दागिने एक लाख 52 हजार चोरांनी पळवले. तीन तोळे सोन्याचे सेट, दोन तोळे तुळसी माळ, दोन तोळे चैन, एक तोळे चेन, अंगठ्या एक तोळे, एक तोळे कर्णफुले नथ असा ऐवज होता. चोरांनी लोखंडी कपाट उचकटून आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिलेे. ठसे घेतले आहेत. श्‍वानपथकही आले होते, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तापडिया यांचे बाळीवेस येथे राधा मेडिकल डिस्ट ्रीब्यूटर्सचे होलसेल दुकान आहे.