बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील साज फूड प्रॉडक्ट्सच्या उत्पादन केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, साज फूड प्रॉडक्ट्स प्रा.लि. चे विदर्भात उत्पादन केंद्र सुरू होते आहे ही बाब आनंददायी आहे. विविध प्रकारांच्या आणि चवीच्या बिस्कीटांची देशात मोठी मागणी आहे. नागपूर येथील उत्पादन केंद्रात बिस्किट निर्मिती प्रक्रियेत उच्च दर्जा आणि स्वच्छता राखला जात आहे. मध्य भारतातही साज फूड प्रॉडक्ट्स कंपनी नक्कीच नाव मिळवेल. राज्य शासनाने कंपनीला मेगा स्टेटस असा दर्जा दिलेला आहे. नागपूर येथील उत्पादन केंद्रामध्ये1500 स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. विदर्भ व मराठवाड्यात उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
