दिवसेंदिवस जातीय अभिनिवेश वाढत चालला आहे:डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे
बाबूजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित इतिहास मानसशास्र मराठी भूगोल राज्यशास्त्र या पाच विषयांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले असुन या जेष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे उद्धघाटन हे प्रसंगी बोलत होते की, आज आतंकवादाने विक्राळ रूप धारण केले असून कधी जागतिक महायुद्ध होईल हे सांगता येणार नाही,निसर्गाने मानवाला समूहामध्ये जगायला शिकवले पण आज वैश्विक आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे म्हणून माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. २०१४ च्या निवडणुकांनी भारतीय राजकारणाची दिशा बदलली भारतात घडत असलेला बदल तात्काळ उलटून टाकावा. या विचाराचा एक गट तर हा बदल झाल्यास भारत जगात महासत्ता होईल या विचाराचा दुसरा गट सक्रिय होत आहे. या दोन्ही गटामध्ये समन्वय साधण्याची गरज निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अड.सुरेशराव आव्हाड तर व्यासपीठावर प्राचार्य जी.पी.ढाकणे, अयोध्या येथील प्रा.डॉ.अभय कुमार सिंह, अलीगड विद्यापीठाचे डॉ.ताहेर पठाण, औरंगाबाद येथील डॉ.प्रशांत अमृतकर, नेवासा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे डॉ.किशोर धनवटे, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.बी चव्हाण, डॉ.सुभाष शेकडे, डॉ.अशोक कानडे, डॉ.अभिमन्यू ढोरमारे, प्रा.ब्रह्मानंद दराडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,सूत्रसंचालन प्रा.मन्सूर शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अशोक कानडे यांनी केले.
