Breaking News

मनपाच्या मोकळ्या जागा खाजगी तत्वावर देतांना करदात्यांचा विचार व्हावा - कृष्णा पाटील

ठाणे, दि. 18, जानेवारी - भारताचे भावी क्रिडा पट्टू ठाण्यातून निर्माण व्हावेत या गोंडस नावाखाली ठाणे महापालिका हद्दीतील करदात्या नागरिकांच्या पैशातूनउभे राहिलेल्या क्रिडा वास्तू, जागा आज खाजगी करणा-या माध्यमातून काही संस्थांना आंदण दिल्या जात आहेत. भरमसाठ फी घेऊन प्रशिक्षणदेणाऱया या संस्थांना वेळीच आवार घालावा व करदात्या सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना या सुविधा अल्पदरात उपलब्ध करुन द्याव्यात अशीमागणी भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केली आहे.


ठाणे महापालिकेने उपवन तलावाजवळील गावंड बाग येथे फुटबॉल टर्फ उभारण्याचा निर्णय घेतला असून मे. इन्फिनिटी टर्फ एलएलपी या संस्थेलाठाणे मनपा आयुक्तांनी यांच्या मान्यतेने स्वारस्य देकार दिला आहे. त्यानुसार 11 हजार 274 चौरस मीटर जागा या संस्थेला देण्यात येणार आहे. हेमैदान पब्लिक प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. ठाणे मनपा या मैदानात कार्यालय, स्वागत कक्ष आणि स्छच्छतागृहांचीउभारणी करणार आहे. वीज आणि पाणीपुरवठाही ठाणे महापालिकाच करणार आहे. कदात्यांच्या पैशातून ठाणे मनपा जागा आणि इतर सोयी सुविधाउपलब्ध करुन देत असली तरी ठाणे महापालिकेच्या शाळेतील फक्त 10 मुलांनाच इथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इतर सर्वसामान्य करदात्यामुलांनाही संस्था जी फी आकारणार आहे ती परवडण्यासारखी नसल्याचे मत कृष्णा पाटील यांनी व्यक्त करुन यावर अंकुश असणे गरजेचे असल्याचे तेम्हणाले.