Breaking News

मनसेतर्फे नगरसेवकांना गुलाब पुष्प देऊन सभागृहात गांधीगिरी आंदोलन


पुणे, दि. 18, जानेवारी - गेली 10 ते 12 वर्षापासून महापालिकेच्या नगरवस्ती विभागामार्फत स्मार्ट संस्थेच्या वतीने 230 संगणक ऑपरेटर कामावर घेण्यात आले होते. मात्र, जानेवारी 2017 पासून त्यांची मुदत संपुष्टात आली. त्यानंतर त्यांची फेरनेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे या महिला कर्मचार्‍यांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. या सर्व संगणक कर्मचार्‍यांना त्वरीत कामावर घ्यावे, यासाठी मनसेतर्फे नगरसेवकांना गुलाब पुष्प देऊन सभागृहात गांधीगिरीने आंदोलन करण्यात येत आहे. यासंबंधीचे निवेदन महापौर आणि पालिका आयुक्तांनाही देण्यात आले आहे. प्रशासनाला हात जोडून गांधीगिरीने केलेली मागणी कळत नसेल तर मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा रुपाली पाटील यांनी यावेळी दिला.