Breaking News

जीवन आपले असले तरी मार्गदर्शन संताचेच असले पाहिजे -रंजाळे महाराज

कोपरगाव ता. प्रतीनिधी :- जीवन आपले असले तरी मार्गदर्शन संताचेच असले पाहिजे असे प्रतिपादन ह . भ . प रंजाळे महाराज यांनी भोजडे येथे केले. कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील चारूदत्त सिनगर यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. संसारात आपले हीत नाही . आपल्या हीतासाठी सावध असले पाहीजे . आपल्या प्रत्येक श्वासावर भगवंताचा अधिकार आहे . त्यांचे चिंतन आपण केले पाहीजे . स्वामी विवेकानंदानी शिकागोची धर्म परीषद जिंकली कारण त्यांच्या आइने त्याच्याकडून गीतेचा अभ्यास करुन घेतला होता .वेद व इतर ग्रंथात मातेला फार मोठे स्थान आहे .ज्याच्या पाठीशी आई वडील असतात तो सर्वात श्रीमंत असतो. आपणच आपल्या भाग्याचे शिल्पकार आहोत तर भगवद्गीता आपल्याला कसे जगावे हे शिकवते तर श्रीमद्भागवत कसे मरावे हे सांगते असे यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी महाराजांनी " आपुलीया हिता जो असे जागता " हा संत तुकाराम महाराजांचा अभंग निरूपणसाठी घेतला होता .