Breaking News

मकरसंक्रांत निम्मित पैठणच्या गोल्डन ग्रुप तर्फे अपंग विद्यालयात चटई वाटप


पैठण प्रतिनिधी :- गोल्डन ग्रुप ,पैठण च्या वतीने मकरसंक्रांत निम्मित पैठणच्या अपंग विद्यालयात विद्यार्थ्यांना चटई वाटप तसेच पुरणपोळीच्या स्नेहभोजनाचा आगळा वेगळा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पैठणचे तहसिलदार श्री.महेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना चटई चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले 

तहसिलदार श्री.सावंत यांनी गोल्डन ग्रुप ने राबवलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करतांना ही गोल्डन ग्रुप ची खरी गोल्डन ओळख असल्याचे नमूद केले .व्यक्ती पेक्षा समाज मोठा आहे व समाजापेक्षा समाजकार्य मोठे आहे म्हणूनच गोल्डन ग्रुप ने हा समाजकार्याचा वसा हाती घेतला असून या पार्श्वभूमीवरच हा कार्यक्रम अपंग विद्यालयात घेतला असल्याचे गोल्डन ग्रुप चे पवन लोहिया यांनी सांगितले.