Breaking News

14 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पना


नवी मुंबई,  - ’स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ’स्वच्छ सर्वेक्षण 2018’ मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान संपादन करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिका सामोरे जात असून या मध्ये लोकप्रतिनिधी व सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभत आहे. शहर स्वच्छतेमध्ये नवी मुंबईतील मुलांच्या संकल्पनांचाही विचार व्हावा व त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेला अधिक गती मिळावी या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धमध्ये महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतील 14 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत स्वच्छतेविषयीच्या आपल्या कल्पक संकल्पना चितारल्या आणि हा अभिनव उपक्रम सर्वार्थाने यशस्वी केला.