Breaking News

महावितरणच्या विरोधात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन


पारनेर/प्रतिनिधी /- गावठाण हद्दीतील रोहिञ सुमारे दोन महिन्यापासुन ब़ंद असल्याने परिसरातील पिके जळुन चालली आहेत. शेवटी अखेर या प्रश्नावर ग्रामस्थांनी शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंकेची भेट घेतली. त्यांनी तात्काळ शेतक-यांच्या प्रश्नासाठी महावितरणच्या पारनेर येथील मुख्य कार्यालयात एक तास ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके यांनी केले.

तालुक्यातील जातेगांव येथील संतप्त ग्रामस्थांनी घाणेगांव रोडवरील गावठाण हद्दीतील रोहिञ सुमारे दोन महिन्यापासुन ब़ंद असल्याने परिसरातील पिके जळुन चालली आहेत. म्हणुन महावितरणच्या संबधित कार्यालयाशी ग्रामस्थ वेळोवेळी विचारणा करीत असत. पण शेतक-यांना कार्यालयांकडून टोलवा- टोलवीची उत्तरे मिळत असत. मात्र जेव्हा शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले. तेव्हा या आंदोलनाची तात्काळ दखल घेत महावितरणचे उपअभियंता पगारे बी.जी.यांनी आंदोलनकर्त्यांना रोहिञ उद्या दि.19 रोजी दुपारपर्यंत बसविण्यात येईल.त्यांच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात विठ्ठल भगवंत पोटघन,विठ्ठल यादव ढोरमले,गवराम पांडुरंग ढोरमले,जय मारुती पोटघन,गिरिष दिलिप वाखारे,गुलाब नारायण ज-हाड,भाउसाहेब सिताराम ज-हाड,बाळासाहेब सिताराम पोटघन,पोपट सिताराम ज-हाड,नारायण पांडुरंग पोटघन,कारभारी भाउसाहेब पोटघन,सोपान म्हपाजी पोटघन,फकिर अमिर पठाण,संजय दादा गायकवाड आदि उपस्थित होते