Breaking News

भीमा नदीवर बांध घालून वाळू तस्करी सुरू ; साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

सोलापूर, - वाळू माफियांचा जिल्ह्यात वेगळाच कारनामा समोर आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे भीमा नदीवर बांध घालून वाळू तस्करी सुरू होती. याठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे 15 ट्रक, 2 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबीसह वाळूचा मोठा साठा असा साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हणमो पोटील, पिंटू पाटील, मल्लू पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्ह्यात वाळू उपसा बंद असताना चोरून वाळू उपसा सुरू असल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आल्या होत्या. त्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिका- यांनी पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या होता. शेगाव येथे भीमा नदीवरील वाळू उपशाचा ठेका संपलेला असतानाही वाळू ठेकेदाराने अवैध उपसा सुरुच ठेवला होता. या अवैध वाळू उपशावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.