Breaking News

कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आग


पुणे, - औद्योगिक वसाहतीमध्ये असणार्‍या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. येथे सुरू असलेल्या गॅस वेल्डिंगच्या मुळे ही आग लागली. येथून हाकेच्या अंतरावर अग्निशामक दलाचे केंद्र आहे. त्यामुळे काही मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान तेथे आग विजवण्यासाठी पोहोचले.