Breaking News

विविध संघटनांचे पिंपरीत धरणे आंदोलन

पुणे, दि. 21, जानेवारी - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांसाठी लावण्यात आलेला शास्तीकर संपूर्ण रद्द होणे, अनियमित बांधकामे नियमित करण्याबाबत बनविण्यात आलेली नियमावली रद्द करून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी नियमावली बनविण्याबाबत त्यास राज्य सरकारची मंजुरी घेणे, शहरातील सर्व स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये अंत्यसंस्काराची जबाबदारी महापालिकेने घेणे आणि कालबाह्य झालेला प्रस्तावित रिंगरोड रद्द करणे, अशा विविध मागण्यांसाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या धरणे आंदोलनाला शनिवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. 


पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (शनिवारी) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धरणे आंदोलनात मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्वराज अभियानाचे मानव कांबळे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ, भारीप, आरपीआय कवाडे गट, शेकाप, प्रहार संघटना, सीपीएम, सीपीआय, बोपखेल संघर्ष समितीचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाली आहेत.