Breaking News

विधीमंडळ अधिवेशन काळात ‘भुजबळ समर्थक’ मुंबईत धडकणार

नाशिक, दि. 21, जानेवारी - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूड बुद्धिने कारवाई केल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय ‘भुजबळ समर्थक’ एकटवले असून राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात सर्वपक्षीय भुजबळ समर्थक मुंबईत धडकणार असल्याचा निर्णय आज भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून नाशिक येथे जयशंकर फेस्टिवल ला ॅन्स येथे आयोजित केलेल्या बैठकीत झाला. यावेळी नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील सर्व भुजबळ समर्थक आमदार अधिवेशन काळात विधानसभेच्या पायर्‍यांवर आंदोलन करणार असल्याचा निर्धार बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी केला. 


भुजबळ समर्थक समन्वय समितीच्या बैठकीत गाव पातळीपासून देशपातळीपर्यत ‘भुजबळ समर्थक जोडो अभियान’ राबविण्यात येणार असून भुजबळ समर्थक समन्वय समित्या गठीत गेल्या जाणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा भुजबळ समर्थक समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आली. सदर बैठकीत ‘भुजबळ साहेब हेच माझे नेते, भुजबळ साहेब हीच माझी ताकद, ‘भुजबळ समर्थक’ हेच माझे पद’ या ब्रीद वाक्याखाली पक्षभेद विसरून सर्वपक्षीय भुजबळ समर्थक एकत्र आले. सदर बैठकीचे नियोजन भुजबळ समर्थक समन्वय समितीचे समन्वयक दिलीप खैरे यांनी केले.