Breaking News

ग्राहकांच्या खात्यातील पैसे अचानकपणे झाले विड्रॉ


डोंबिवली, दि. 21, जानेवारी - कष्टाने कमावलेले पैसे बँकमध्ये सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. येथील ग्राहकांची विविध बँकांमध्ये खाती असून त्यातील काही ग्राहकांच्या खात्यातील पैसे अचानकपणे विड्रॉ झाले असून दिल्ली येथे ते वर्ग झाले आहेत. येथील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅनरा बँकेमधील सुमारे 7 ग्राहकांना असा विचित्र अनुभव आला असून त्यांच्या खात्यातील सुमारे सव्वा दोन लाखांची कॅश ही दोन दिवसांपासून आपोआप वळती झाली आहे. गुरुवार रात्रीपासून घडल्याचे ब ँक प्रशासनाच्या लक्षात आले असून ग्राहकांनी त्यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात तसेच विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.