Breaking News

मकरसंक्राती निमित्ताने झाडांचे रोपटे देवून केला सण साजरा.


कुकाणा/ प्रतिनिधि/- नेवासा तालुक्यातील चिलेखणवाडी येथे महिला सरपंच संगीता संजय सावंत व राधाबाईं नाथा गुंजाळ यांनी अनोख्या पद्धतीने मकरसंक्राती सण साजरा केला. विशेष म्हणजे गावातील सर्वे महिलांना सोबत घेवुन हळदी- कुंकवाचा कार्यक्रम केला. यात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी महिलांना पारंपरिक रितीरिवाजा प्रमाणे वाण भेट न देता त्यांनी प्रत्येक महिलेला एक उपयोगी झाडांचे रोपटे भेट दिले. त्यातून समाजाला एक नवा संदेश जाईल, यासाठी झाडे आपल्या निसर्गासाठी किती महत्वाचे आहेत ? हे त्यांनी यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळी महिलांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तर कार्यक्रमासाठी युवा नेते संजय सावंत व उपसरपंच नाथाभाऊ गुंजाळ यांनी सहकार्य केले .-