Breaking News

रक्तपेढी ही आपली सर्वाची जबाबदारी - सुभाष देसाई


सर्व रक्तपेढ्यांनी नियमांचे पालन करुन आपल्या रक्तपेढया सुरळीत चालवाव्यात. रक्तपेढ्या ही चळवळ केवळ शासनाची नसून यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वाची आहे; असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयातील आयोजित बैठकीत सांगितले.राज्यातील धर्मादाय संस्थाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध प्रलंबित विषयाच्या संदर्भात श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त अ.ता.निखाडे, राज्य रक्त संक्रमण संकुल चे संचालक डॉ. थोरात, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण चे संचालक डॉ. एस. आचार्य, महात्मा गांधी सेवा मंदिर रक्तपेढी चे डॉ.किशोर झा, मिनाताई ठाकरे रक्तपेढी चे डॉ.आदित्य तारे, चिदानंद ब्लड बँक अभिजित बोपर्डीकर, इंडिया रेड क्रॉस, मुंबई चे डॉ. नायडू, डॉ. झरीन भरूचा, डॉ. आनंद देशपांडे, डॉ. निजहरा, प्रतिभा बारी, रमेश इस्वलकर, अविनाश शिरोडकर आदी उपस्थित होते.