Breaking News

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कन्या विद्यामंदिर अजिंक्य.


कर्जत/प्रतिनिधी /- कोकमठाण ता.कोपरगाव येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कर्जत तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना सोनमाळी कन्या विद्यामंदिर येथील मुलीच्या कबड्डी संघाने जेतेपद पटकावले. त्यामुळे या संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे . 
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. सो.ना.सोनमाळी कन्या विद्यामंदिरच्या इयत्ता 6 ते 8 वीच्या वयोगटातील मुलींच्या संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवत असताना पायल जगताप, स्नेहा बागल, वैष्णवी दवणे, समीक्षा रानसिंग यांच्या सुरेख पकडी व चढाया करुन प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. 

तर इशा डोंगरे, उत्कर्षा मोहिते, अक्षता पठाडे, सुप्रिया भोसले, मधुरा बोरुडे, वैष्णवी फरताडे, प्रिया काकडे, पूनम गायकवाड यांनी मोलाची साथ दिली. या खेळाडुना क्रीडाशिक्षक संजय देशमाने , आशिष निंबोरे, राजेंद्र साळवे, सचिन पानपट यांचे मार्गदर्शन लाभले. राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे , रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके, जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, मुख्याध्यापिका संजीवनी लोंढे, पर्यवेक्षक वसंतराव चटाले यांनी खेळाडू व शिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

खेळाडूंना गणवेश.
कन्या विद्यामंदिरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सीना शुगर मॅन्यु. कंपनी,ज्योतिबावाडी चे संस्थापक अँड गजेंद्र बागल यांनी सुमारे १०,०००/- रुपये किमतीचे खेळाचे गणवेश भेट दिले आहेत .