मुलाने केली पित्याला मारहाण ;गुन्हा दाखल
आपल्या वयोवृद्ध वडील घरातून निघून जावेत यासाठी आणि वडिलांकडे असलेली थोडे फार पैसे आपल्याला मिळावेत. यासाठी एकुलता एक मुलगा वारंवार मारहाण करत होता . मात्र दिनांक १७ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तू घरातून कायमचा निघून जा. आम्ही तुला सांभाळणार नाही. तुझा आम्हाला काही उपयोग नाही. असे म्हणत हातातील काठीने बापू दरेकर याने आपले वडील दगडू दरेकर यांच्या डोक्यात , पाठीत , खान्द्यावर मारहाण केली . त्यांच्या गळ्यावर पाय ठेऊन मारण्याचा प्रयत्न केला . यावेळी दगडू दरेकर यांनी आरडाओरड केली, मात्र त्यावेळी कुणीच जवळ नसल्याने त्यांना आणखीनच मारले . काही वेळाने त्यांच्या आवाजाने जवळील नातेवाईक मदतीला आले त्यांनी दगडू दरेकर यांना श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . यानंतर श्रीगोंदे पोलिसांनी वयोवृद्ध दरेकर यांचे जबाब ग्रामीण रुग्णालयात जाऊन घेतले . दगडू दरेकर यांच्या फिर्यादीरन त्याचा एकुलता एक मुलगा बापू दरेकर आणि सून छाया दरेकर यांच्या विरोधात जबरी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस नाईक अनिल भरती करत आहेत .
