Breaking News

मराठवाडा, विदर्भातील 5149 गावांना होणार 2800 कोटी रुपयांची मदत


मुंबई, दि. 20, जानेवारी - विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील 5149 गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणार्‍या ‘नानाजी देशमुख कृषी सं जिवनी प्रकल्पा’चा अंमलबजावणी आराखडा आज अंतिम करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत प्रकल्प करारनाम्याच्या मसुद्यावर जागतिक बँकेसोबत स्वाक्षर्‍या क रण्यात आल्या. प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेऊन प्रकल्पाबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकु मार यांनी सांगितले.
राज्याच्या मराठवाडा, विदर्भ या दुष्काळग्रस्त भागाकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हवामानावर आधारित शेती करताना शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवितानाच सहभागी गावातील ज मिनीचे मृद संधारण करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात विदर्भ आणि मराठवाड्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील सहा वर्ष हा प्रकल्प राबविण्यात येईल.