Breaking News

नागपुरात एचसीएलच्या अत्याधुनिक कॅम्पसचे उद्घाटन


नागपूर :- माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे संशोधन आणि बदलामुळे नवीन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन युवकांनी आपल्या करिअरची सुरुवात करावी. एचसीएलसारख्या जागतिक स्तरावरील प्रकल्पामुळे स्थानिक प्रशिक्षित युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून हा प्रकल्प मिहानचे भविष्य बदलवेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त मिहान येथील जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजी कॅम्पसचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते तर एचसीएल टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष पद्मभूषण शिव नाडर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, आमदार समीर मेघे, एचसीएलचे उपाध्यक्ष सी. विजय कुमार आदी उपस्थित होते.