बोट दुर्घटनेची शनिवारपासून सुरु असलेली शोधमोहीम थांबवली
डहाणूमध्ये शनिवारी 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटून अपघात झाला होता. यातील 35 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले होते. बाहेर क ाढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णाालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी बोटीवर सेल्फी घेण्याच्या मोहापायी बोटीच्या एका बाजूला सरकले आणि ही दुर्घटना घडली असल्याचे डहाणूची राणी बोटीचे खलाशी महेंद्र यांनी सांगितले.
