Breaking News

किल्ले विजयदुर्ग ढासळतोय...

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, जानेवारी - सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला खरा परंतु त्याही अगोदर गडकिल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरीखुरी ओळख असलेला किल्ले विजयदुर्ग मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षापायी काळाच्या ओघात ढासळताना पाहायला मिळत आहे. या किल्ल्याची लवकरात लवकर डागडूजी करावी अशी मागणी किल्लेप्रेमीकडून होत आहे.


इतिहासाची साक्ष देणार्‍या किल्ले विजयदुर्गच्या तिन्ही बाजूने समुद्र असल्याकारणान दररोज विजयदुर्ग किल्लाला अजस्त्र लाटांचा मारा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या कि ल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी देखील हळूहळू ढासळत चालली आहे. किल्ल्याचा समुद्रलगतचा काही भाग लाटामुळे कोसळलेला आहे. चार वर्षांपूर्वी असाच एक किल्लाचा भाग क ोसळला होता, मात्र त्यावर शासनाने थोडा फार निधी खर्च करून पडलेला भाग बांधण्यात आला. तसेच काही ठिकाणी किल्ल्याला लाकडी दरवाजांचा वापर केलेला आहे तो सुद्धा कुठेतरी पावसाचं पाणी पडून नष्ट होत चालला आहे.