खरगपूर : पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. एक अनियंत्रित प्रवासी बस रस्त्यालगतच्या खंदकात कोसळली. या अपघातामध्ये बसमधील ६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास सातकी गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला.
बस अपघातात ६ ठार.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:43
Rating: 5