Breaking News

केरळात दुसरे साक्षरता आंदोलन.


तिरुअनंतपूरम : गत दोन दशकापासून पूर्ण साक्षर राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळने दुसऱ्या जन साक्षरता आंदोलनाला सुरुवात केली असून या माध्यमातून राज्यातील निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे. युनेस्कोच्या मापदंडानुसार ९० टक्के जनता साक्षर असणाऱ्या राज्याला १०० टक्के साक्षर राज्याचा दर्जा दिला जातो. यानुसार १८ एप्रिल १९९१ रोजी केरळ राज्य १०० टक्के साक्षर झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या राज्यात अद्यापपर्यंत १८ लाख नागरिक निरक्षर असून त्यांना साक्षर करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारीपासून 'अक्षरलक्ष्यम'या नावाने साक्षरता अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे या अभियानाचे संचालक श्रीकला यांनी सांगितले.