Breaking News

’जाटों का अड्डा’ फेसबुक पेजवरून ’पद्मावत’ चित्रपट लीक

मुंबई, - ’जाटों का अड्डा’ फेसबुक पेजवरून संपूर्ण ’पद्मावत’ चित्रपट लीक करण्यात आला आहे. या चित्रपटाचा लाईव्ह व्हिडीओ काढून करणी सेनेने हा व्हिडीओ फेसबुकवर टाकला असल्याचे सांगण्यात येत आहे. अवघ्या काही सेकंदातच हजारोंच्या संख्येने हा व्हिडीओ शेअरही करण्यात आला.


सद्यस्थितीत हा व्हिडिओ फेसबुकवरून काढून टाकण्यात आला आहे. हा चित्रपट लीक करणार्‍या व्यक्तींवर आयटी अ‍ॅक्ट, कॉपीराईट अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षातज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी सांगितले. तसेच लीक झालेला व्हिडिओ शेअर करणार्‍यांनाही तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड भरावा लागू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.