Breaking News

प्रबोधनातुन विद्यार्थी सुसंस्कृत घडतो ः पालकमंत्री शिंदे

जामखेड /ता. प्रतिनिधी :- जिवन जगत असताना प्रत्येकाला जिवनाचे महत्त्व समजले पाहिजे, वादळे निर्माण होतात मात्र वादळांतुन जो वाट काढतो तोच जिवनात यशस्वी होतो. प्रत्येकाला आपले जीवन कसे जगावे समजले तरच पुढे चांगला माणूस घडेल असे मत व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांना दिला. जामखेड केमिस्ट असोसिएशन मार्फत व्याख्याते प्रा. वसंत हंकारे यांचे चला माणूस घडऊया विषयावर नागेश विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी ना. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आयुक्त प्रमोद कातकडे, औषध निरीक्षक अतिश परकाळे, सभापती सुभाष आव्हाड, मा. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माऊली गायकवाड, मंगेश आजबे, स्कूल कमीटी सदस्य विठ्ठल राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने, सुर्यकांत मोरे मुख्याध्यापक संपत काळे, सचिन भंडारी, शंकर गदादे, महेश नारके, अंगद मुळे, मनोज बन, तात्यासाहेब बांदल, सचिन जाधव, प्रविण कात्रजकर, संजय यादवसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 


पालकमंत्री प्रा. राम शिंदे बोलताना म्हणाले की, समाज जीवनाची ओळख होत असताना एक देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने समाज घडविण्यासाठी नागरीक म्हणून काम केले पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्याची खरी गरज आहे. कारण प्रबोधनाच्या माध्यमातून सुुुुसंस्कृत विद्यार्थी घडण्याचे काम होत असते. या नंतर केमिस्ट जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आल्याचे जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माऊली गायकवाड यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशिष पाटील यांनी केले.