कोेपरगांव : प्रतिनिधी :- तालुक्यातील वारी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या मनिषा विशाल गोर्डे या विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार सुसरे यांनी काम पाहिले. गोर्डे यांच्याविरूध्द काळे गटाचे महेंद्र बाळासाहेब बागूल यांना शून्य मते तर अपक्ष विवेक अशोक टेके यांना ४ मते हे निवडणूक रिंगणात होते. संपूर्ण तालुक्याचे या निवडीकडे लक्ष लागले होते. कोल्हे गटाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मोरे, अनिता संत, वनिता चव्हाण, रोहिणी निळे, गोकुळ कानडे, अनिल गोरे, चंद्रकला गोर्डे, संजय जाधव, नंदा निळे, अश्विनी खैरनार, राहुल टेके, सुवर्णा गजभिव या १३ जणांनी मनिषा गोर्डे यांना मतदान करून विजयी केले. पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी निवडणूक प्रकिया यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. नवनिर्वाचित उपसरपंच मनिशा गोर्डे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बाबूराव गोर्डे यांनी आभार मानले.
वारीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या मनिषा गोर्डे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:55
Rating: 5