Breaking News

मुंबई -खंडाळा सायकल शर्यतीत सुदर्शन, विवेक ठरले विजेते


मुंबई, - माजी राष्ट्रीय विजेते आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते अशोक खळे जायंट स्टारकेन मुंबई खंडाळा 90 किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत ए लिट गटात पुण्याच्या सुदर्शन देवर्डेकरने बाजी मारली. एमटीबी हायब्रीड गटात जुन्नरच्या विवेक वायकरने वर्चस्व गाजवले.मकरंद माने हा या शर्यतीतील शेडुंग या एकमेव प्राईमचा विजेता ठरला. अमेच्युर सायकलिंग असोसिएशन ऑफ बॉम्बे सबर्बन डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनतर्फे ही शर्यत आयोजित करण्यात आली होती 
खार येथून सुरु झालेल्या या शर्यतीचा चुनाभट्टीपर्यंत मार्ग हा न्यूट्रल झोन होता. त्यांनंतर मात्र शर्यतीत चांगली चुरस पहायला मिळाली. सकाळी लवकर शर्यत सुरु झाल्यामुळे थंड हवामानाचा फायदा मिळाल्यामुळे खोपोलीपर्यंत सर्व सायकलपटू एकत्रच होते. त्यामुळे स्पर्धेतील एकमेव प्राइम जिंकण्यासाठी सायकलपटूंनी जोरदार प्रयत्न केले. त्यात मक रंद मानेने 1 तास 13 मिनिटे 07 सेकंद अशी वेळ नोंदवत शेडुंग प्राईमचे पारितोषिक जिंकले. सायकलपटूंसाठी नेहमीच आवहनात्मक ठरलेल्या भोर घाटाने यावेळीही सायक लपटूची परीक्षा पाहिली. पण घाटाचे आव्हान सहज पेलवताना सुदर्शनने 2 तास 17 मिनिटे 05 सेकंद अशा वेळेत 90 किलोमीटरचे अंतर पार करत पहिले स्थान मिळवले. सुदर्शन पाठोपाठ विवेकने 2 तास 24 मिनिटामध्ये हे अंतर पूर्ण करत एमटीबी गटाचे विजेतेपद मिळवले.