सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करू नये : उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार्या न्यायमूर्तींचे समर्थन केले. न्यायदेवतेला कुणी मुकी बहिरी करण्याचा प्रयत्त करत आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, न्यायदेवतेला त्यांचे काम करू द्या असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी घेतलेली पत्रकार परिषद ही लोकशाहीत दुर्दैवी घटना आहे. या चारही न्यायमूर्तींच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते पण त्यांनी हे पाऊल का उचलले याचा विचार करणे गरजेचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाहीचा स्तंभ स्वतंत्र्यपणे उभा राहिला पाहिजे, जर याचा पाया कमजोर झाला तर लोकशाही ढासाळली जाईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच न्या. लोया मृत्यू प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.