Breaking News

हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला


मकर संक्रांति निमित्त जयहरी महिला प्रतिष्ठानच्या वतीने माजी जि. प. सदस्या आशा मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा येथील श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात आयोजित तिळगुळ व हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद स्त्री शक्तीतच असून सोशिकता व सहनशीलता हे परमेश्‍वराने स्त्रीला दिलेली देणगीच असल्याचे प्रतिपादन आशा मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना केले. शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. नगरपंचायतच्या नगराध्यक्षा संगीता बर्डे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर आशाताई मुरकुटे, हभप गायत्री वाघ, मन्नाबी शेख, नगरसेविका सीमा मापारी, अनिता डोकडे, डॉ. निर्मला सांगळे, अनिता शिंदे, स्मिता देशपांडे, भारती बेद्रे, पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगल जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना मुरकुटे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाल्या की, महिला ही एक शक्ती असून हळदी कुंकु व तिळगुळ कार्यक्रमानिमित्त ती एकत्र यावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून सर्व महिलांना एकत्रित करून हा उपक्रम राबविला जात आहे, यामुळे दोन मने चार गोड शब्दांनी जोडण्याचे काम होते. यावेळी बहिरवाडीच्या सरपंच मंगल वाखुरे, पाचेगावच्या संगीता कांबळे, शारदा औटी आदिंसह महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता हिवाळे यांनी केले .