Breaking News

एमबीबीएस डॉक्टरांच्या जागेवर आयुर्वेद वैद्य नेमण्यास वाढता विरोध

डोंबिवली, दि. 18, जानेवारी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या 20 तारखेच्या सभेत एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या वेतनश्रेणीवर आयुर्वेद वैद्य नेमण्यास कल्याण डोंबिवली महापालिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांचा वाढता विरोध असून ही नाराजी व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांचे शिष्टमंडळाने आज आयुक्त वेलारासु यांची भेट घेऊन नाराजी दर्शवली.


राज्य शासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेतील वैद्यकीय अधिकार्‍यांची 115 पदे मंजूर केली असून 51 पदे भरलेली आहेत त्यापैकी 64 पदे रिक्त आहेत. या जागेवर पदवीधर एम.बी.बी.एस. डॉक्टरांची भरती न करता त्यांच्या वेतनश्रेणीवर बी.एम.एस. (आयुर्वेद) वैद्य नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत प्रशासनाने मांडला आहे. याला पालिकेतील वैद्यक ीय अधिकार्‍यांचा विरोध असून तशी नाराजी वैद्यकीय अधिकार्‍यानी आयुक्तांकडे व्यक्त केली.