समर्थ वुमेन्स वेल्फेअरच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी, दि. 20, जानेवारी - मुंबईतील समर्थ वुमेन्स वेल्फेअर असोसिएशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने आज चिपळूण येथे आयोजित केलेल्या व्यवसायाभिमुख प्र शिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
वुमेन्स वेल्फेअर असोसिएशन महिला, बेरोजगार तरुण-तरुणी व विद्यार्थ्यांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविते. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समर्थता निर्माण व्हावी, हा या संस्थेचा उद्देश असतो. मुंबईप्रमाणे यंदा रत्नागिरी जिल्ह्यात असोसिएशन खादी आणि ग्रामोद्योग आयोगासमवेत व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला असून चिपळूण येथील हॉटेल अतिथीमध्ये प्रशिक्षण पार पडले. परिसरातील महिला आणि तरुणांनी त्याचा लाभ घेतला. या उपक्रमासाठी समर्थ वुमेन्स वेलअर असोशिएशनला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तांत्रिक सहकार्य केले. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सुरू असलेल्या विविध योजना, त्यातून मिळणारे लाभ, त्यासाठी भांडवल पुरवठा, कच्च्या मालाचा पुरवठा, पक्क्या मालाच्या विक्रीची व्यवस्था आदींबद्दल माहिती देण्यात आली. इच्छुक ांना तज्ज्ञांद्वारे व अधिकार्यांद्वारे सहकार्यही करण्यात आले. कोकणात उत्पादित होणार्या शेतीमालातून आणि कोकणात असलेल्या संधी यांबाबत यात विशेष मार्गदर्शन करण्यात आले. घरच्या घरी किंवा महिला बचत गटांद्वारे अनेक छोटेछोटे उद्योग करता येऊ शकतात. त्यातून रोजगार निर्मिती होतेच पण आत्मनिर्भरताही येते. सरकारने त्यासाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचणे हा आमचा मानस आहे, या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन स्वत:चा आर्थिक विकास घडवून आणावा व जीवन सुकर, समृद्ध आणि समर्थ करावे, असे आवाहन यावेळी समर्थ वुमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा उल्का (राजश्री) विश्वासराव यांनी के ले.
दरम्यान, असेच शिबिर उद्या ( 20 जानेवारी) देवरूख नगर पंचायतीच्या समाज मंदिर हॉलमध्ये दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. यावेळी देवरूखचे नगराध्यक्ष नीलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये व संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव उपस्थित राहणार आहेत.