Breaking News

पंढरपुरात 5 लाखांची दारू जप्त


सोलापूर, दि. 20, जानेवारी - शहर पोलिसांनी 5 लाख 77 हजारांची 900 लिटर हातभट्टी घेऊन निघालेली जीप पकडली. संशयित दोघांना अटक केली.सोलापूर नाका प रिसरात ही कारवाई केली. विजय गोविंद चव्हाण (वय 25), शेखुंबर लल्लू नदाफ ( 20, दोघेही रा. मुस्ती तांडा, ता.दक्षिण सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित दारूने भरलेल्या ट्यूब जीपमधून नेते होते.